टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने जोहान्सबर्ग च्या चौथ्या एक दिवसीय सामन्यात कारकीर्दीतलं तेराव शतक ठोकलं.धवन च्या कारकीर्दीतला हा १०० वा एकदिवसीय सामना आहे. शंभराव्या सामन्यात शतक ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज आहे. धवनने ९ चौकार आणि एका षटकारासह शतकाला गवसणी घातली.या सामन्यात सलामीचा रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर धवन आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. विराटने ८३ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ७५ धावांचं योगदान दिलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews